१४ वर्षाच्या पुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकाला दोघांनाही धरलं पण नशिबात काही वेगळचं होतं…,
पाटणा: प्रेम आंधळ असतं असं म्हणतात. प्रेमात अनेकांना ना वय दिसतं, ना नाती. बिहारच्या भागलपूरमध्ये सुलतानगंजमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एक पुतण्या काकीच्या प्रेमात पडला. जवळपास दोन वर्षांपासून त्यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. कुटुंबियांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यांनी दोघांना समज दिली. नात्यांच्या मर्यादा पाळण्याचा सल्ला दिला. मात्र तरीही काहीच उपयोग झाला नाही.
भागलपूरमधील सुलतानगंजमध्ये मिरहटी गाव आहे. इथे राहणाऱ्या माहेश्वरी मांझी यांचा विवाह २०१७ मध्ये मुंगेरमध्ये वास्तव्यास असलेल्या मिनाक्षी यांच्याशी झाला. ४ वर्षे त्यांचा संसार सुखानं चालला. यादरम्यान मिनाक्षी यांना एक मुलगा झाला. मात्र २०२१ मध्ये सुखी संसारात मिठाचा खडा पडला. मिनाक्षीचे मोठ्या दिराच्या मुलासोबत सूर जुळले. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. कुटुंबियांनी त्यांना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. त्यानंतर त्यांना समज देण्यात आली. बाहेर कोणाला कळलं तर समाजात अब्रुचे धिंडवडे निघतील, अशा शब्दांत त्यांना समजवण्यात आलं. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही.
अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं. माहेश्वरी मांझी यांनी पोलीस ठाणं गाठताच मिनाक्षी महिला डेस्ककडे पोहोचल्या. त्यांनी मदतीची याचना केली. महिला डेस्कनं त्यांच्या पुतण्याला पोलीस ठाण्यात बोलावलं. त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दोघेही लग्नावर अडून बसले. शेवटी मिनाक्षीचा पती माहेश्वरीनं कुंकू आणलं आणि रात्री उशिरा सुलतानगंजमधील हनुमान मंदिरात दोघांचा विवाह लावून दिला.