१ लेकरु, नवरा असतांनाही बायकोच्या लफड्याला काय ब्रेक लागना, मग सिंधुदुर्गात पतीना तिला रात्री मित्राकडं नेऊन…

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून गोवा येथील एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणून टाकण्यात आलेला आहे. पोलीस तपासात आत्तापर्यंत प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध तोडून टाकावेत असे अनेकदा पतीने सांगून देखील तिच्या वर्तणुकीत बदल होत नसल्याने संतापलेल्या पतीने हा प्रकार केलेला असल्याचे समोर आलेले आहे . गोव्यातून त्याने तिचा खून करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घोटगेवाडी इथे तिचा मृतदेह आणून टाकलेला होता त्यानंतर त्याने तिची ओळख पटू नये म्हणून चेहरा देखील विद्रूप केलेला होता मात्र अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, विशिता विनोद नाईक ( वय 30 वर्ष राहणार वास्को गोवा ) असे महिलेचे नाव असून दोडामार्ग पोलिसांनी तिचा पती विनोद मनोहर नाईक ( वय 40 मूळ राहणार वास्को सध्या राहणार मापसा ) आणि त्याचा मित्र ऋतुराज श्रावण इंगवले ( वय 27 मूळ राहणार चंदगड जिल्हा कोल्हापूर ) यांना अटक केलेली आहे.

घोटगेवाडी परिसरात अज्ञात महिलेचा चेहरा विद्रूप केलेला मृतदेह आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश ठाकूर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि तपासाची सूत्रे फिरवण्यास सुरुवात केली. महिलेच्या वेशभूषेवरून महिलाही गोव्यातील असल्याचा अंदाज आला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू करण्यात आला. मापसा पोलीस ठाण्यात विशिता विनोद नाईक ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या प्रियकराने केलेली होती त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्याने मृतदेहाची ओळख पटवली आणि तिचा पती असलेला विनोद याच्यावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी विनोदला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने गुन्हा कबूल केलेला आहे.

2015 मध्ये विनोद याचे विशितासोबत लग्न झालेले होते त्यानंतर दोन वर्षांनी त्यांना मुलगी देखील झाली मात्र 2020 मध्ये विशिता हिचे तिच्या माहेरच्या गावातील एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली आणि कुटुंबात वाद होऊ लागले त्यानंतर विशिता हिने वेगळे राहण्यास सुरुवात केली आणि न्यायालयात देखील घटस्फोटापर्यंत प्रकरण सुरू होते. वेगळे राहत असले तरी देखील ती पतीला देखील भेटत असायची आणि त्यांच्यात प्रियकरावरून वाद देखील होत होते.

विनोद यांना चालू असलेला सुखाचा संसार मोडण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी तिला प्रियकरासोबत असलेले संबंध कायमचे संपवून टाक याविषयी समज दिलेली होती मात्र ती ऐकतच नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दोडामार्ग इथे तिला आणले आणि घोटगेवाडी इथे नेऊन मित्राच्या मदतीने सोमवारी रात्री एकच्या सुमारास तिचा खून केला अशी कबुली दिलेली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *