२४ वर्ष आई एकाचं ताटात जेवायची, तिच्या निधनानंतर उघडलं रहस्य; अनेकांचे डोळे पाणावले

आई तर हि आई असते, तिचे प्रेम अनमोल असते.आपल्या लेकरांचे रक्षण करण्यासाठी ती वाघाशीही लढते.एकच आई आहे जी लेकरांवर कुठल्याही स्वार्थाशिवाय प्रेम करते.आईचे प्रेम आपण शब्दात मांडु शकत नाही पण तिला अनुभवल्यावर तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.आईच्या ममतेची अशीच एक अनोखा गोष्ट सर्व मिडीयावर व्हायरल होत आहे.जी ऐकुन प्रत्येकजण भावुक झाले.खरं तर एक आई २४ वर्षे एकाच ताटात जेवायची.आईच्या निधनानंतर मुलाला जेव्हा यामागचे रहस्य कळले तेव्हा त्याचे डोळे पाणावले.त्याने हि गोष्ट लोकांसोबत शेअर केली,जी आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे.

थाळीची हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट
हा फोटो विक्रम या नेटकर्याने १९ जानेवारी रोजी ट्विटरवर पोस्ट केला होता.त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,हि आईची थाळी आहे.तिने गेल्या २ दशकांपासुन यामध्ये जेवण केले आहे.तीएक छोटीशी थाळी होती,ज्यामध्ये ती तिच्याशिवाय फक्त चुलबुलीला(श्रुती, माझी भाची) आणि मला जेवायला देत असे.

तिच्या निधनानंतर मला माझ्या बहिणीकडुन या थाळीचे महत्त्व किंवा त्याचं रहस्य कळलं.खरं तर मी हि थाळी सातवीत बक्षीस म्हणुन जिंकली होती असं तिने सांगितलं.पुढं विक्रम म्हणाला हि गोष्ट आहे १९९९ सालची.त्यावेळी मी सातवीत शिकत होतो आणि हि थाळी बक्षीस म्हणुक मिळाली होती.

गेल्या २४ वर्षात माझ्या आईने माझ्या या जिंकलेल्या प्लेटीत जेवण केलंय.हे खुपचं गोड आहे आणि अर्थातच तिने मला याबद्दल कधीही सांगितले नाही.आई मला तुझी लय आठवण येते असं तो म्हणाला.गेल्या ३० डिसेंबरला विक्रमच्या आईचं निधन झालं.त्याचे ट्विट सोशल मिडीयावर व्हायरल झालं आहे,ज्याला आतापर्यंत जवळपासा पंधरा हजार लाईक्स आणि २ हजाराहून अधिक रिट्विट्स केले आहे.

या गोष्टीनं सोशल मीडियावरील प्रत्येकजण भावुक झालायं.अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.एकानी म्हटलं की आई हि अशीच असते.तर एकानी आईच्या प्रेमापुढे इतर सर्व प्रेम कमी आहे असं म्हटलं.एक नेटकरी म्हणाला की हे फक्त एक आईच करू शकते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *