२ मिनीटाच्या अंतराने माय-लेकानी सोडले प्राण, एकमेंकाकडे पाहत होते😥 ;संभाजीनगर हादरलं

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून, दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. समीर विष्णू म्हस्के असं हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून पत्नीचे आरती समीर म्हस्के तर मुलाचं निशांत समीर म्हस्के नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर म्हस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलासह राहत होता. मात्र, आमल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घ्यायचा. यावरुन अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होते.

दरम्यान, काल रात्री पुन्हा या विषयावरुन वाद झाला. त्यानंतर समीर याने घरातील दोरीने पत्नी आरती आणि मुलगा निशांत यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात पतीने आपल्या पत्नीची आणि मुलाची हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

तर आरोपी समीर म्हस्के याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं समोर आलं आहे. तर आईनेच आपल्या मुलाला हत्या करण्यासाठी सांगितलं असल्याचा आरोप आरतीच्या माहेरच्यांनी केला आहे.आरती म्हस्के यांचे नातेवाईक यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आहे.

समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर आरतीचा व निशांतचा दोरीने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणी समीर विष्णु म्हस्के आणि त्याची आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *