३५ वर्षीय विधवा महिलेचं ४ म्हतार्यासोबत होते प्रेमसंबंध अन् ५व्याची ऐन्ट्री होताचं गेम झाला

पाटणा – बिहारमधील नालंदा येथुन अनैतिक संबंध आणि प्रेमप्रकरणाचं एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे.नालंदा येथे एका वृद्धाला या प्रेमप्रकरणाची किंमत जीव गमावुन मोजावी लागली आहे.एका ३५ वर्षीय विधवा महिलेने ४ वृद्ध प्रियकरांसोबत मिळुन पाचव्या बाॅयफ्रेंडची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी जेव्हा या प्रकरणात या कथित प्रेमिकेला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा या हत्येचा भांडाफोड झाला.तसेच त्याबाबत ऐकुन पोलिसही हैराण झाले.हा धक्कादायक प्रकार अस्थामा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलवापुर गावामध्ये घडला आहे.इथे एक ३५ वर्षीय विधवा महिला चहा-बिस्कीटचं दुकान चालवते.

तिचे तिथे ४ वृद्धांसोबत अनैतिक संबंध होते.यादरम्यान,या प्रेमकहाणीमध्ये तृपित शर्मा(७०) या ५व्या वृद्धाची एंट्री झाली.त्यानंतर जे काही घडते ते धक्कादायक होते.या तृपित शर्माने इतर वृद्धांप्रमाणेच या महिलेकडे शारिरीक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली.

या प्रकारामुळे या महिलेचे आधीचे कथित प्रियकर संतापले.याबाबत पोलिसांनी सांगितले की,या सर्वांनी सदर महिलेसोबत मिळुन ५व्या प्रियकराची हत्या करण्याची योजना आखली.या महिलेने ४ जणांसोबत मिळुन शर्मा याला १९ फेब्रुवारी रोजी एका निर्मनुष्य भागात बोलावले.

त्यानंतर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली.तसेच त्याची बाॅडी पाण्याच्या टाकीमध्ये फेकला आणि मृताची ओळख पटु नये म्हणून त्याचा चेहरा दगडाने ठेचुन विद्रुप करण्यात आला.त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.तसेच मृताच्या लेकाने पोलिसांमध्ये तक्रार दिली.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला.त्यामध्ये मृत नेहमी चहाच्या टपरीवर बसायचा अशी माहिती समोर आली.मृताचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता.मात्र आठवड्याभरानंतर मोबाईल स्वीच ऑन करताच तो आधीच सर्विलान्सवर टाकलेला असल्याने त्याची माहिती पोलिसांना कळाली.त्यानंतर पोलिसांनी हा मोबाईल संशयित महिलेकडुन जप्त केला.तसेच तिची कसुन चौकशी केली असता तिने आपण ४ वृद्धांसोबत मिळून या व्यक्तीची हत्या केल्याचे मान्य केले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *