३ दिवसांपुर्वी वारलेला नातु आज्जीला स्वप्नातं जिवतं दिसला अन् कबर खोदल्यावर भलतचं घडलं

महरी- उत्तर प्रदेशच्या लखनऊमधील दुबग्गाच्या सैदपुर महरी गावात एक हैराण करणारी घटना घडली आहे.३ दिवसांपूर्वी मृत पावलेल्या चिमुकल्याचा मृतदेह कबर खोदुन बाहेर काढण्यात आला.आजीने स्वप्नात तिचा नातु अक्षय हा जिवंत असल्याचं पाहिलं.

3 दिवसांपूर्वीच नाताचा मृत्यू झाला होता.आजीने स्वप्नात अक्षय जिवंत असल्याचं पाहिल्यावर कबर पुन्हा खणण्यात आली आणि त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार,14 फेब्रुवारीला सैदपूर महरी गावात राहणाऱ्या 3 वर्षीय अक्षयला अचानक उलट्या होऊ लागल्या.घरच्यांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं.तिथं डॉक्टरांनी त्याला तपासुन मृत घोषित केलं.

यानंतर कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह गावाबाहेर दफन केला.विधीवत अंत्यसंस्कार करून कुटुंबीय आणि नातेवाईक घरी निघुन गेले.पण ३ दिवसांनी भलतंच घडलं.आजीला ३ दिवसांनी पडलेल्या स्वप्नात अक्षय जिवंत असल्याचं दिसलं.आजीने कुटुंबीयांना स्वप्नाबाबत सांगितलं.त्यानंतर कुंटुबियांनी पुन्हा एकदा खरच अक्षय जिवंत असेल या आशेने कबर खोदली.त्याआधी तिथे पुजा केली.

अक्षयचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि लखनऊच्या बलरामपुर रुग्णालयात नेला.डॉक्टरांनी बाॅडी पाहिली आणि चिमुकल्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं.मात्र कुटुंबीय हे ऐकायला तैयार नव्हते.अक्षयचे नातेवाईक ऐकत नसल्याचं पाहुन हाॅस्पिटल प्रशासनाने घटनेची माहिती पोलिसांना दिली.पोलीस रुग्णालयात पोहोचले.

त्यांनी नातेवाईकांची परिस्थिती पाहिली आणि सहानुभूती म्हणुन डॉक्टरांना पुन्हा एकदा अक्षयची बाॅडी तपासण्यास सांगितलं.डॉक्टरांनी अक्षयचे पल्सेस चेक केले.नंतर हार्ट बीटही चेक करण्यासाठी ईसीजी मशीन लावली.मात्र मुलाकडुन कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.कारण 3 दिवसांपुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *