३ मुलांचा बाप, ति विवाहित अन् दरवाजामागं दोघांना धरल्यावर जबरदस्तीने लावलं लग्न

बिहारच्या जमुईमध्ये तीन मुलांचा बाप एका विवाहित महिलेच्या प्रेमात पडला. बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडच्या भेटीगाठीही बराच वेळ सुरू होत्या. याच दरम्यान, प्रेयसीला भेटताना पकडल्यानंतर गावकऱ्यांनी प्रियकराला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोघांचं कॅमेऱ्यासमोर जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

लक्ष्मीपूर पोलीस ठाण्याच्या बेलातांड गावातील हे प्रकरण आहे. येथे राहणारा ३० वर्षीय अजय यादव विवाहित असून त्याला ३ मुले आहेत. होळीच्या दिवशी अजय त्याची मैत्रीण सावित्री कुमारीला भेटायला आला होता. यावेळी गावकऱ्यांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली.

सावित्रीचेही दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तिचा नवरा काही कारणास्तव तिला सोडून गेला होता आणि ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत होती. यानंतरच सावित्री अजय यादवच्या प्रेमात पडली आणि दोघांची भेट होऊ लागली. वेगवेगळ्या जातीचे असूनही दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांसोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली. पण लग्न केले नाही.

अजयने सांगितले की, तो अनेकदा त्याची गर्लफ्रेंड सावित्रीला भेटण्यासाठी तिच्या गावी जात असे. अजयनेही गावकऱ्यांसमोर कबूल केले की, त्याने वर्षभरापूर्वीच सावित्रीशी लग्न केले होते. जबरदस्तीने लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजयची पत्नी बबिता देवी नाराज झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *