४१ वर्षाचा व्यक्ती नागपुरात मुलीसोबत लाॅजवर, दारुसह व्हायग्राच्या २ गोळ्या अन् सकाळी मालकाला धक्काचं बसला

नागपुर : दारुसोबत व्हायग्रा या सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्यांचे सेवन करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले होते.नागपुरात काही महिन्यापुर्वी ४१ वर्षीय व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली होती.गुंतागुंतीच्या या मृत्यू प्रकरणाचा गुढं आता वैद्यकीय अभ्यासकांनी केली आहे.

मेंदुत रक्तस्राव झाल्यामुळे दारुसोबत व्हायग्रा गोळ्याचं सेवन केल्याच्या दुसऱ्या दिवशी व्यक्तीचा मृत्यू झाला होता,असा दावा दिल्लीच्या ‘एम्स’मधील ६ संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या केस रिपोर्टमध्ये सांगण्यात आला आहे.ऑक्टोबर २०२२ मध्ये सादर केलेल्या त्या प्रबंधात संबंधित व्यक्तीला सेरेब्रोव्हॅस्क्युलर हॅम्रेज झाला असल्याचे उघडं झाले आहे.

संशोधकांच्या अहवालानुसार,त्या ४१ वर्षीय व्यक्तीला कोणतीही सर्जिकल आणि मेडिकल हिस्ट्री नव्हती.तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत नागपुरातील एका लॉजच्या रुममध्ये राहत होता.त्याने रात्री sildenafil(प्रत्येकी 50mg) च्या 2 गोळ्या आणि सोबत दारु घेतली.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर जेव्हा त्याला अस्वस्थ वाटु लागलं,तेव्हा प्रियसी घाबरली.त्यात त्याला उलट्याही होत होत्या.त्याच्या प्रियसीने वैद्यकीय मदत घेण्याचा आग्रह धरला.मात्र याच्या आधीही अशी लक्षणे मी अनुभवली होती,असे सांगुन त्याने प्रियसीला काळजी न करण्यास सांगितलं.जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनच्या सप्टेंबर आवृत्तीत हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.त्याची अस्वस्थता वाढु लागली आणि नंतर त्याला हाॅस्पिटलमध्य़े नेण्यात आले,मात्र डाॅक्टरांनी तपासुन मृत जाहिर केले.

पाॅस्टमोर्टन रिपोर्टनुसार डॉक्टरांना मोठ्या मेंदूच्या तळाशी असलेले मज्जापेशीत सुमारे 300mg रक्त गोठलेले आढळले.सुक्ष्म तपासणीत आढळलेले इतर महत्त्वपुर्ण असे निष्कर्ष म्हणजे त्याच्या यकृतातील फॅट्समध्ये झालेला मोठा रचनात्मक बदल.अल्कोहोल आणि गोळ्याचं मिश्रण आणि सोबतचं आधीच असलेला उच्च रक्तदाबामुळे त्याचा मृत्यू झाला.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *