४ दिवसांपुर्वी मुलीचे धुमधडाक्यात लग्न अन् आज जवानाचा जीव गेला, जालन्यात धक्कादायक घटना समोर

जालनाः जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात बोलेरो पिकअपने दिलेल्या जबर धडकेत सीमा सुरक्षारक्षक जवान जागीच ठार झाले.इतकंच नव्हे तर त्यांच्या लेकाने काळजावर दगड ठेवत इयत्ता १० वीच्या परिक्षेचा पेपर देऊन वडिलांवर अंत्यसंस्कार केल्याची मन व्याकुळ करणारी घटना घडली आहे.त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी या घटनेने लोकांचे डोळे पाणावले.

दिनांक ३ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर-वडीगोद्री या राष्ट्रीय महामार्गावर भालगाव फाट्यावर हि अपघाताची घटना घडली होती.वडीगोद्री ता.अंबड येथील रहिवासी हनुमान यशवंता लिपणे(वय ४३) हे त्रिपुरा राज्य आसाम येथे सीमा सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत होते.४ दिवसापुर्वी लेकीचे लग्न झाले असुन मुलीच्या लग्नानिमित्ताने ते सुट्टी काढुन ते घरी आले होते.

आज रविवारी त्यांची सुट्टी संपणार असल्याने मुलाच्या पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे शाळेत फि भरण्यासाठी ते आपल्या गाडी नंबर MH.21.AJ.5799 ने गेले होते.लेकीच्या शाळेची फीभरुन लिपणे वडीगोद्री या आपल्या गावी परत येत असताना पाठीमागुन बोलोरो पिकअपने गाडीला जोराची धडक दिली.हि धडक इतकी जोरदार होती की हनुमान लीपणे हे जागीच गतप्राण झाले.

आईचे छत्र हरवले असताना वडिलांच्या अपघाती मृत्यूने बहीण-भावाला धक्का बसला आहे.जवान वडिलांचा मृतदेह हाॅस्पिटलमध्ये असताना काळजावर दगड ठेवुन मुलगा सुशांत हनुमान लिपने याने दहावीचा पेपर दिला.त्यानंतर वडीलांच्या अंत्यविधीला हजर झाला.

सीमा सुरक्षा जवान हनुमान लिपणे यांची रविवारी सुट्टी संपणार असल्याने ते लवकरचं कर्तव्यावर हजर होणार होते.परंतु काळाने अगोदरच घाला घातला आणि क्षणात जगाचा निरोप घेतला.धडक दिल्यानंतर पिकअप चालकाने पिकअपसह पळ काढला होता.परंतु उपस्थित लोकांनी पाठलाग करून पिकअप आणि ड्रायव्हरला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *