६० वर्षाचा सासरा सुनेच्या प्रेमात आंधळा, तिच्यासाठी सायकल चोरली अन् सोमवारी तर हद्दच पार केली

Love Triangle: प्रेमात कोणतीही सीमा नसते. म्हणून लोक प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. लोक प्रेमासाठी काहीही करायला तयार होतात. राजस्थानमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. इथे एका सासरा आपल्या सूनेला घेऊन फरार झाला. इतकंच नाही तर सून आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला तिथेच सोडून गेली. पतीने पत्नी आणि वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

राजस्थानच्या बूंदीमध्ये ही घटना घडली. सासरा आपल्या मुलाच्या पत्नीच्या प्रेमात पडला आणि इतकंच नाही तर तो तिला घेऊन फरार झाला. जेव्हा मुलाला याबाबत समजलं तेव्हा त्याने पोलिसांना याची सूचना दिली. मुलाने असाही दावा केला की, वडिलांनी पत्नीला पळवून नेण्यासाठी सायकलही चोरी केली.

पीड़ित पवन वैरागीने वडील रमेश वैरागी विरोधात तक्रार दाखल केली आणि पत्नीसोबत घटस्फोटासाठी अर्जही केला. पवननुसार, वडिलांनी त्याला त्याच्या पत्नीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला.

पोलीस आता या घटनेची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पवन याला सहा महिन्यांची मुलगी आहे. त्याने दावा केला की, त्याच्या वडिलांनी त्याची सायकल चोरी केली आणि पत्नीला घेऊन फरार झाले. त्याशिवाय त्याने असंही सांगितलं की, त्याच्या पत्नीला त्याचे वडील फसवत आहेत. तिचा यात काही दोष नाही. त्याने हेही सांगितलं की, आपल्या कामामुळे तो नेहमीच गावातून बाहेर राहत होता. पत्नी घरी राहत होती. पोलीस चौकशी करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *