७ वर्षापुर्वी ज्या ठिकाणी आई गेली त्याचठिकाणी लेकानीही सोडले प्राण, संभाजीनगरमध्ये थरकाप उडवणारी घटना

छत्रपती संभाजीनगर : दहावीचा पेपर सोपा गेल्यामुळे वडील, मुलगा आणि बहिणीने बाहेर जाऊन एकत्र आइस्क्रीम खाल्ले.त्यानंतर तिघेही घरी परतले.वडील आणि बहीण झोपी गेल्यानंतर अल्पवयीन मुलाने घरातील कार बाहेर काढली.ती घेऊन क्रांती चौकाकडुन सिडकोकडे जाताना नियंत्रण सुटल्यामुळे एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलावर जोर्यात आदळली.यात त्यानी जागीचं प्राण सोडले.हि घटना गुरुवारी रात्री २ वाजता घडली.याच ठिकाणी ७ वर्षांपूर्वी त्याच्या आईचाही दुचाकीने उडविल्यामुळे मृत्यू झाला होता,अशी माहिती समोर आली आहे..

सोहम नीरज नवले(वय १७) असे मृत मुलाचे नाव आहे.जिन्सी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोहम हा शहरातील वंडर गार्डन शाळेतला दहावीच्या विद्यार्थी होता.गुरुवारी त्याने पहिला पेपरही दिला.त्याला कार व्यवस्थित चालविता येत नव्हती;परंतु त्याला कार शिकायची होती.गुरुवारी रात्री तो वडील आणि बहीण सईसोबत कॅनॉट परिसरात आइस्क्रीम खाण्यासाठी गेला होता.

ते रात्री आकरा वाजता घरी परतले व झोपी गेले.मात्र मध्यरात्रीच्या २ वाजताच्या सुमारास सोहम गुपचुप पार्किंगमधुन कार बाहेर काढली.काही वेळाने वडील उठले असता दरवाजा उघडा दिसला.त्यांनी मुलगा सोहमच्या रूममध्ये जाऊन बघितले असता तो गायब होता.बाहेर पाहिल्यावर कारपण नव्हती.त्यामुळे त्यांनी मुलीला विचारलं.

मात्र तिला काही माहिती नसल्याने दोघे सोहमच्या शोधात बाहेर पडले.मात्र इकडे सोहम भरधाव कार चालवीत असताना एसएफएस शाळेसमोरील पादचारी पुलास जोर्यात धडकला आणि जागीचं ठार झाला.या प्रकरणी सोहमच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्याच विरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिलीय.

७ वर्षांपुर्वी आईचाही मृत्यू
निरज नवले हे प्लॉटच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करतात.त्यांना १ मुलगा व मुलगी आहे.त्यांच्या बायकोचा एसएफएस शाळेजवळच ७ वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये रस्ता ओलांडताना दुचाकीने उडविल्याने अपघातात मृत्यू झाला होता.त्याच ठिकाणी आज लेकाचाही दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *