120 लेकरांचा एकटा बाप, 14 बायकांसोबत पूलमध्ये रासलीला करणारा ‘हा’ कलाकार बाबा कोण?
Father Yod The Source Family : जगभरात अध्यात्मिक्तेचा आधार घेऊन नागरीकांचा छळ, लुटमार करणारे अनके बाबा आतापर्यंत होऊन गेले आहेत. अशाच एका ढोंगी बाबाची घटना आता चर्चेत आली आहे. या बाबांवर 11 बॅंका लुटल्याचा आणि 13 विमानांवर हल्ला करून त्या पाडल्याचा गंभीर आरोप आहे.इतकेच नाही तर या बाबाच्या 14 बायका होत्या, तर या सर्व बायकांसोबत तो दररोज पुलमध्ये अंघोळ करायचा.हा बाबा 140 मुलांचा बाप होता. आता हा बाबा नेमका कोण आहे? तो आध्यात्मिकतेकडे कसा वळला? आणि आध्यात्मिकतेच्या आडून त्याने कसे काळे धंदे केले हे जाणून घेऊयात.
या बाबाला फादर यॉड नावाने ओळखले जायचे. त्याचे खरे नाव जिम बेकर होते. दुसऱ्या विश्व युद्धातील बहादूरीसाठी त्याला सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले होते. तो मार्शल आर्टसमध्ये एक्सपर्ट होता. त्याच्यावर 11 बॅंका लुटल्याचा गंभीर आरोप होता. 1963 मध्ये त्याला दोन लोकांच्या हत्येप्रकरणी दोषीही ठरवण्यात आले होते. मात्र एका सैनिकापासून धार्मिक गुरु बनण्याची त्याची कहानी खुपच रंजक आहे.
आलिशान हॉटेल्स उघडली…
दुसऱ्या विश्व युद्धाच्या समाप्तीनंतर जिम बेकर हॉलिवूड सिनेमा टार्जनच्या शुटींगसाठी गेला होता. मात्र त्याची निवड झाली नव्हती. यानंतर त्याने हॉटेल्स उघडण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्याने ओल्ड वर्ल्ड आणि अवेयर इन नावाचे हॉटेल्स उघडली होती. हा त्याचा व्यवसाय खुप यशस्वी ठरला. या दरम्यान त्याची भेट धार्मिक गुरु योगी भजनशी झाली.आणि इथूनच जिम बेकरची फादर य़ॉड बनण्याची कहानी सुरु झाली.
हॉटेलच्या आड सुरु केले काळे धंदे
धार्मिक गुरुच्या भेटीनंतर जिम देखील आध्यात्मिकतेकडे वळला. जिमने स्वत:चे आध्यात्मिक तत्वज्ञान अंमलात आणले.यामध्ये मोफत प्रेम, आध्यात्मिक सेक्स, गांजा फुकणे अशा गोष्टी हॉटेलमध्ये् सुरु केल्या. यानंतर तो लोकांना फादर य़ॉड असल्याचे सांगू लागला आणि स्वत:चे अनुयायी बनवू लागला.त्याने त्याच्या या सर्व ग्रुपला ‘सोर्स फॅमिली’ असे नाव दिले. हा सर्व ग्रुप तीन खोल्यांमध्ये राहायचा.
त्याचा हा संपूर्ण ग्रुप हॉटेलमध्ये काम करायचा. ज्यामुळे हॉटेलची खुप कमाई व्हायची. या ग्रुपमधील 16 वर्षाच्या तरूणीसुद्धा त्याच्यापासून गर्भवती राहिली होती. या ग्रुपमध्ये जितकी मुले जन्म घ्यायची तितके त्याचे अनुयायी वाढायचे. या सर्व 140 मुलांना त्यांनी त्याचे आडनाव दिले होते. या ग्रुपने आध्यात्मिक गाणी देखील काढली होती, जेणेकरून गाण्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. फादर यॉडचा या म्युझिक ग्रुपला लीड करायचाय. या ग्रुपने 60 अल्बम रेकॉर्ड केले होते.
पोलिसांपासून वाचण्यासाठी ही शक्कल लढवली
फादर यॉडने ग्रुपमधल्याच अनेक महिलांसोबत लग्न केले होते. एका 16 वर्षाच्या मुलीसोबत देखील त्याने लग्न केले होते. त्यानंतर तिचे लग्न ग्रुपमधल्याच एका मुलासोबत लावले होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी अनेक महिलांचे लग्न ग्रुपमधील व्य़क्तींशी केले होते. फादर यॉडच्या एकूण 14 बायका होत्या, त्यापैकी एक आध्यात्मिक बायको होती.
फादर य़ॉर्डने केलं सुसाईड
फादर यॉर्ड 1975 मध्ये हॅंड ग्लाईडींग करायला गेला होता.याचा त्याला अजिबात अनुभव नव्हता. फादर यॉर्डने ग्लाईडरसोबत 1300 फिट उंचावरून उडी घेतली होती,यामुळे तो थेट जमीनीवर येऊन कोसळला होता. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. एका रिपोर्टमध्ये ही बाब देखील समोर आली होती की, तो अपघातन नव्हे तर आत्महत्या होती. कारण घटनेपुर्वी त्याने शरीर त्याग करण्याची गोष्ट त्याचा ग्रुपमध्ये बोलून दाखवली होती.
फादर यॉर्डच्या मृत्यूनंतर तो आध्यात्मिकतेच्या नावाखाली काय काय काळे धंदे करायचा हे उजेडात आले होते. ही सर्व घटनाक्रम पाहून अनेकांना मोठा धक्का बसला होता.