15 महिन्याच्या लेकराला दुर्मीळ आजार, १७ कोटींची गरज अन् सेकंदात घडला मोठा चमत्कार

थिरुअनंतपुरम: आई-बाप आपल्या लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात.आपल्या लेकरांना सर्दी पडसं जरी झालं तरी त्यांचा जीव कासावीस होतो.मुळच्या केरळच्या आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेल्या एका दाम्पत्यांची व्यथा यापेक्षा कितेकपट मोठी आहे.त्यांच्या १५ महिन्यांच्या बाळाला स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉपीचा त्रास आहे.हा अतिशय दुर्मिळ आजार मानला जातो.त्यासाठी कोट्यवधी रुपये लागत होते,

अदिती नायर आणि सारंग मेनन यांनी त्यांच्या १५ महिन्यांच्या बाळासाठी सोशल मिडीयावर मदतीचं आवाहन केलं.मुळचे केरळच्या पलक्कडचे रहिवासी असलेले सारंग आणि अदिती सध्या मुंबईत स्थायिक झाले आहे.सारंग आणि अदिती यांच्या बाळाला स्पायनल मस्क्युलर ऍट्रॉपीचा त्रास आहे.त्यासाठी त्यांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं.उपचारांसाठी तब्बल १७.५ कोटी रुपयांची गरज आहे.क्राऊड फंडिंगच्या माध्यमातुन त्यांनी हि रक्कम उभारण्याचं ठरवलं.

मिलाप संस्थेच्या मदतीनं मेमन दाम्पत्यांनी लोकांना मदतीचं आवाहन केलं.पैसे जमतील की नाही,अशी चिंता त्यांना होती.दोघेही हताश होते.मात्र एका क्षणात दोघांची चिंता दुर झाली.एका अज्ञात व्यक्तीनं तब्बल ११.६ कोटी रुपये या चिमुकल्यासाठी दान म्हणुन दिले.विशेष म्हणजे त्यानं आपली ओळख लपवुन ठेवली आहे.सारंग आणि अदिती यांनी या अज्ञात देवदुताचे मनापासुन आभार मानले आहेत.

अज्ञात व्यक्तीनं केलेल्या ११.६ कोटी रुपयांच्या मदतीनं मेमन दाम्पत्यांना आशा कायम आहे.त्यांना आता केवळ ८० लाख रुपये पाहिजेत.दोघांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची देखील भेट घेतली आहे.बाळाच्या उपचारांसाठी लागणारी औषधं परदेशातुन आयात करावी लागणार आहेत.त्यांच्यावर वस्तु आणि सेवा कर लागु नये,अशी विनवणी दाम्पत्यानं सीतारामन यांच्याकडं केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *