2 दिवस उशीर झालाय…सॉरी जान! पोस्ट करत नवविवाहितेनं आयुष्य संपवलं ; गोठ्यात दुध काढायला प्रियसी गेली तर…

जयपूर: राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका तरुणानं आत्महत्या केली आहे. प्रेयसीचं लग्न झाल्यानं तरुणानं विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. प्रियकरानं आत्महत्या केल्यानं प्रेयसीला धक्का बसला. तिनं तीन दिवसांनंतर तिनंही विहिरीत उडी घेत जीवनप्रवास थांबवला. प्रेयसीनं आत्महत्येआधी सोशल मीडियावर प्रियकरासोबतचा एक फोटो शेअर केला होता.

आपण सोबत जगण्या-मरण्याची शपथ घेतली होती. मग एकट्यानं असं पाऊल का उचललं, असं तिनं फोटोसोबत लिहिलं होतं.’या क्रूर जगात मला एकटीला का सोडलं? आता मी तुझ्याकडे येत आहे. तू कायमच माझा असशील. दोन दिवस उशिरा झाला. त्यासाठी सॉरी,’ असं प्रेयसीनं सोशल मीडियावर लिहिलं. त्यानंतर तिनं आयुष्याचा प्रवास थांबवला.

थोरीमन्ना पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शोभाला जैतमाल येथे ही घटना घडली. अनिता (२२) आणि पुरखाराम (२८) यांचे प्रेमसंबंध होते. दोघे स्पर्धा परिक्षांची तयारी करत होते. या दरम्यान ४ जुलैला अनिताचं लग्न अन्यत्र झालं. त्यामुळे पुरखाराम हताश झाला. त्यानं ४ जुलैला विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ५ जुलैला विवाहित प्रेयसी माहेरी आली होती. तेव्हा तिला पुरखारामच्या मृत्यूबद्दल समजलं.

विवाहित अनिता शुक्रवारी सकाळी दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. बराच वेळ ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबियांनी तिचा शोध सुरू केला. अनिताला शोधता शोधता कुटुंबीय विहिरीपर्यंत पोहोचले. तिथे त्यांना दुधाचं भांडं दिसलं. नविवाहितेचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर मृतदेह अनिताच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.

अनिताचा विवाह ४ जुलैला झाला. त्यानंतर ती सासरी गेली. त्याच दिवशी तिचा प्रियकर पुरखारामचा मृतदेह विहिरीत सापडला. त्यानं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. यानंतर तीन दिवसांनी नवविवाहितेनं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पण तिच्या कुटुंबियांनी वेगळा दावा केला. अनिताचा मृत्यू पाय घसरुन विहिरीत पडल्यानं झाल्याची माहिती तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *