2 मुलांची आई माहेरचं कारण सांगून निघाली, पुढं बाॅयफ्रेंडला घेऊन लाॅजवर गेल्यावर उलटचं घडलं

हल्दवानी : पती-पत्नीच्या नात्यात संशयानी जागा घेतली,की ते नातं विस्कटुन जातं आणि आजकाल पती-पत्नीच्या विभक्त होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.तसेच विवाहबाह्य संबंधांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे.यातुन मग घटस्फोट तसेच काही ठिकाणी हत्या-आत्महत्या सारख्या घटना उघडकीस येत आहेत.यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यात एका पतीनं बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं.त्यामुळे त्याचा संशय खरा ठरला.माहेरी जाते असं सांगुन घरातुन निघालेल्या बायकोचा पाठलाग करून त्यानं त्या दोघांनाही रुममध्ये पकडलं.हॉटेलच्या खोलीतुन काही आक्षेपार्ह गोष्टीही त्याला सापडल्या.त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना खुप समजावण्याचा प्रयत्न केला;मात्र त्यानंतरही पतीना बायकोला घरी घेऊन जायला नकार दिला.

उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये हि घटना घडली आहे.नवऱ्याला बायकोबाबत संशय होता.बायको आपल्याला फसवत असल्याबाबत नवऱ्याला संशय होता.सोमवारी हा संशय खरा ठरला.त्याची पत्नी घरातुन माहेरी जाते असं सांगुन निघाली.घरातुन निघुन ती तिच्या बाॅयफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेली.बायकोचा पाठलाग करत पतीही त्या हॉटेलमध्ये शिरला तेव्हा त्याचं डोकचं बंद पडलं.त्यानं हॉटेलमध्ये खुप गोंधळ केला.मीडियासोबत पोलिसांनाही त्यानं बोलावुनं घेतलं.

मिळालेल्या वृत्तानुसार,हे जोडपं हल्दवानीच्या पिलिकोठी भागात राहतं.त्यांना दोन मुलं आहेत.नवऱ्याला त्याच्या पत्नीवर काही दिवसांपासुन संशय होता.बायकोचे कोणाशी तरी प्रेमप्रकरण असल्याचं त्याला वाटत होतं;मात्र त्याच्याकडे कसलाही पुरावा नव्हता.सोमवारी बायको माहेरी जाते असं सांगुन घरातुन निघाली,तेव्हा नवऱ्याने तिचा पाठलाग केला आणि संशय खरा ठरला.बायको एका मुलाला जाऊन भेटली व ते दोघं पोलीस चौकीच्या समोर असलेल्या खानचंद मार्केटमध्ये एका लाॅजमध्ये गेले.त्यांच्या मागे लपुन जाऊन नवऱ्यानं त्या दोघांना रंगेहाथ पकडलं.

पतीने हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली.हॉटेलच्या रुममधुन त्याला काही सामानही मिळालं.त्याने पत्नीला जोर्यात कानाखाली मारली व पोलिसांनाही बोलावलं.पोलिसांनी पोहचतं त्या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेलं.तिथे गेल्यावर नवरा-बायकोला समजुन सांगण्याचा प्रयत्न केला.पण नवरा काही ऐकायला तैयार नव्हता.नवऱ्यानं बायकोला घरी घेऊन जाणार नसल्याबाबत पोलिसांना स्पष्ट सांगितलं.पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *