2 विवाहित महिलांचं एकमेकींच्या पतीवर जडलं प्रेम; शेवटी घेतला असा निर्णय नवरे कोमातचं

नवी दिल्ली : ४ जणाचं एक अतिशय अजब प्रेमप्रकरण समोर आलं आहे.हे प्रकरण बिहार राज्याच्या खगडीया जिल्ह्यातील आहे.या घटनेमध्ये दोन जोड़प्यांचा समावेश आहे.या जोडप्यांधील दोन्ही महिला एकमेकींच्या पतीच्या प्रेमात वेड्या झाल्या आणि मग त्यांनी लग्नही केलं.या प्रकरणातील घटनांच्या अनपेक्षित वळणाने परिसरातील नागरिकांना आश्चर्यचकित केलं.माहितीनुसार,पसराहा गावातील रहिवासी असलेल्या रुबी देवीचं २०१० पासुन नीरज कुमार सिंहसोबत लग्न झालं असुन त्यांना ४ अपत्ये आहेत.

या जोडप्याच्या शांततापुर्ण जीवनाला धक्कादायक वळण तेव्हा मिळालं जेव्हा रुबीचं गावातील एक विवाहित व्यक्ती मुकेश कुमार सिंह याच्यावर जीव जडला.विशेष बाब म्हणजे मुकेश विवाहित होता आणि त्याच्या बायकोचं नावही रुबी देवी होतं.अखेरीस नीरजची पत्नी रुबी आणि मुकेश यांनी त्यांच्यासोबत २ मुलं आणि १ मुलगी घेऊन फरार झाले.नंतर फेब्रुवारी 2022 मध्ये एकमेकांशी लग्न केलं.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये निरजची पत्नी रुबी मुकेशसोबत पळुन गेल्यानंतर जे पुढं घडलं ते एदकम विचीत्रचं होतं.रुबीच्या लग्नानंतर नीरज हा खुप नाराज होता आणि त्याने मुकेशवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायत बोलावली,पण मुकेश याने त्यांचा निर्णय पाळला नाही.माहितीनुसार नीरजने मुकेशच्या पहिल्या बायकोसोबत संबंध ठेवुन बदला त्याचा घेण्याचा प्रयत्न केला.

नीरज कसा तरी मुकेशची पहिली बायको रुबी देवीशी प्रेमात पाडलं आणि दोघे नियमितपणे बोलु लागले.शेवटी ते प्रेमात पडले आणि १० फेब्रुवारी रोजी म्हणजे दोघांच्या जोडीदारांनी त्यांना सोडुन दिल्याच्या बरोबर एका वर्षानंतर त्यांनी दोघांनीही एकत्र घर सोडुन पळ काढला.१९ फेब्रुवारी रोजी दोघेही लग्न बंधनात अडकले.

दोन्ही जोडपी मध्य प्रदेशातील वेगवेगळ्या भागात गेल्यानंतर अखेर हे गुंतागुंतीचं प्रेमप्रकरण संपलं आणि चौघांनीही आपल्याला आवडत्या पार्टनरसोबत लग्न केलं.नीरज हा जिओ कंपनीत काम करतो,तर मुकेश हा रोजंदारी मजुर म्हणुन काम करतो.महत्त्वाची बाब म्हणजे नीरजने मुकेशच्या दोन्ही मुलांना दत्तकही घेतलं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *