22 दिवसांपुर्वी लग्न, बीडमध्ये नववधुनेचं बेडरुममध्ये पतीचा केला गेम, नेमकी का केला खून?

बीड : 22 दिवसांपुर्वी लग्न झालेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार बीडच्या निपाणि जवळका गावात उघडकीस आला होता.आता या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली आहे.बायकोनेचं झोपलेल्या पतीचा गळा दाबुन खुन केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.गेवराई पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार समोर येताच गावकर्यांना धक्का बसला आहे.नेमकं कोणत्या कारणावरून पतीचा खुन केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

गेवराई तालुक्यातील निपाणि जवळका गावातील पांडुरंग राजाभाऊ चव्हाण(वय २२) याचे व शीतल सोबत 14 ऑक्टोबर 2022 रोजी पौळाचीवाडी येथे रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले.त्यानंतर पती राजाभाऊ मला बिलकुल आवडत नाही,असे म्हणुन शीतल त्याच्यासोबत नेहमी भांडण करत होती.

दरम्यान रात्री ११च्या दरम्यान हे नवदाम्पत्य आपल्या खोलीत झोपायला गेले.रात्री ११.३० च्या दरम्यान शीतल बेडरुम पळुन बाहेर आली अन् सासु-सासर्‍याला म्हणु लागली की,पांडुरंग हे गार पडलेतं.यावरून तातडीने राजाभाऊला कुंटुबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन राजाभाऊला मृत घोषित केले.

या प्रकरणी सुनेनेच आमच्या मुलाचा खुन केलाय़,असा संशय मृताच्या आई वडीलांनी व्यक्त केला होता.या प्रकरणी पोलिसांनी तपास करत ६ दिवसानंतर शीतल विरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शिततला ताब्यात घेतले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *