286 महिन्यांचा पगार एकाच वेळी बँक खात्यात आला; १.४२ कोटी पाहुन पुण्याचा पठ्याचा पुढं भलताचं पराक्रम
दिल्ली : महिनाभर काम केल्यानंतर सर्वच नोकरदार या मेसेजची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र, एका व्यक्तीच्या बँक अकाऊंटमध्ये एकाच वेळी 286 महिन्यांचा पगार जमा झाला आहे. मोबाईलवर त्याला सॅलेरी क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. ही रक्कम तब्बल 1.42 कोटी रुपये इतकी आहे. या मेसेज नंतर या कर्माचाऱ्याने कंपीनीतून राजीनामा दिला आहे. हा प्रकार दिल्लीतील एका कंपनीत घडला आहे.विशेष म्हणजे संतोष नावाचा हा कर्मचारी मुळ पुण्याचा आहे.ही अजब गजब घटना सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
दिल्लीतील एका कंपनीकडून ही चुक झाली आहे. या कंपनीने 286 महिन्यांचा पगार आपल्या एका कर्मचाऱ्याच्या खात्यात एकाच वेळी पाठवला. चुक लक्षात येताच कंपनीने कर्मचार्याशी संपर्क साधला. यावेळी त्याने पैसे परत करण्याचे आश्वासन दिले, पण नंतर तो आपल्या वकिलासोबत आला आणि कंपनीतून राजीनामा दिला. हा प्रकार Consorcio Industrial या कंपनीत घडला आहे. ही दिल्लीमधील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे.
43 हजारांऐवजी 1.42 कोटी रुपये मिळाले
मीडिया रिपोर्टनुसार या कर्मचार्यांचा पगार 43 हजार रुपये इतका होता. कंपनीने मे महिन्यात त्याच्या खात्यात सुमारे 1.42 कोटी रुपये चुकून ट्रान्सफर केले होते. कंपनीच्या व्यवस्थापनाने रेकॉर्ड तपासले असता ही चूक लक्षात आली. यानंतर कंपनीने त्याला रक्कम परत खात्यात पाठवण्यास सांगीतले. या व्यक्तीने देखील तसे मान्य केले.
आता कंपनी कायदेशीर कारवाई करणार आहे
यानंतर कंपनीने त्याच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. तसेच बँकेकडून ‘रिफंड’ असा कोणताही मेसेज किंवा माहितीही आली नाही. यामुळे 2 जून रोजी संतोष नावाचा हा कर्मचारी आपल्या वकिलासोबत कंपनीत हजर झाला आणि त्याने मॅनेजमेंटकडे आपला राजीनामा दिला. यानंतर हा व्यक्ती नॉटरिचेबल झाल्याचे समजते. अकाऊंटमध्ये क्रेडिट केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी कंपनी आता या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे समजते.