3 मुलांची आई ५ मुल असलेल्या दिरामागं वेडी, रात्री सार सोडुन दिरासोबत जंगलात गेल्यावर…

Crime News : राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातून अनैतिक संबंधातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे तीन मुलांची आणि पाच मुलांचा पिता एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही नात्याने वहिनी आणि दीर लागत होते. नात्याला काळिमा फासणाऱ्या या केसमध्ये दोघेही घरातून फरार झाले होते. नंतर त्यांनी जंगलात जाऊन आत्महत्या केली. तीन-चार दिवस याची कुणालाही खबर नव्हती. पण काही दिवसांनी लोकांना जंगलात त्यांचे लटकलेले मृतदेह दिसले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. दोघांचेही मृतदेह सडलेले होते आणि काळे पडले होते.

पोलिसांनी सांगितलं की, इथे 3 जून रोजी आमजा गावातील जंगलात एक महिला आणि पुरूषाचा मृतदेह लटकलेला आढळून आला होता. दोघांचेही मृतदेह काही दिवसांपासून लटकलेले असल्याने काळे पडले होते आणि त्यातून वासही येत होता. गावातील लोकांनी मृतदेह पाहून पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली काढले. हे मृतदेह कालू (40) आणि बबली (39) यांचे होते.

पोलिसांनी सांगितलं की, प्राथमिक चौकशीतून समोर आलं की, दोघेही नात्याने दीर आणि वहिनी लागत होते. काही दिवसांआधी दोघेही घरातून गायब झाले होते. त्यानंतर बबलीच्या पतीने पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यासोबतच आपला भाऊ कालू विरोधातही तक्रार दाखल केली होती. पोलीस दोघांचाही शोध घेत होते. अशात त्यांचे मृतदेह आढळून आले. दोघांचेही प्रेम संबंध असण्याची शक्यता आहे.

चौकशीतून समोर आलं की, बबलीला तीन मुले आहेत. त्यातील एकाचं लग्न झालं आहे. तेच दीर कालू याला पाच मुलं आहेत. यातील 4 मुली आहेत आणि एक मुलगा आहे. यातील 3 मुलींची लग्ने झाली आहेत. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करत मृतदेहांचं पोस्टमार्टम केलं. त्यानंतर मृतदेह कुटुंबियांना दिले. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *