5 दिवसांपुर्वी लग्न अन् आज आरतीना सोडला जीव, सातार्यात हळद उतरण्याआधीचं नवविवाहितेचा मृत्यू

सातारा : आरती आणि सतीश यांच्या शुभविवाहामुळे लग्नघरातील वातावरण खुलुन गेलं होतं.नातेवाईकांची लगबगही सुरू होती.दोघांच्या संसाराची रेशीमगाठ बांधली गेली होती.लग्नानंतरचे पारंपरिक विधीवत कार्यक्रमही पार पडत होते.पण नियतीने या नवदाम्पत्याच्या जीवनात वेगळंच काहीतरी लिहुन ठेवलं होतं.रविवारी हळद उतरवण्याचा कार्यक्रम सुरू होता.वातावरण प्रफुल्लित होतं,याच दरम्यान वधु आरती हिची तब्येत अचानक बिघडली.

तिला उलट्या,जुलाब होऊ लागल्याने नातेवाईकांची एकच धांदल उडाली.तिला तातडीने रुग्णालयात नेले.मात्र,तेथे तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि दोन्ही कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
महाबळेश्वर तालुक्यातील वाळणे गावातील नवविवाहिता आरती सतीश वाळणेकर(वय २५) हिला जुलाब,उलटी झाले.तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असतानाच आकस्मिक मृत्यू झाला.लग्नानंतर पाचव्या दिवशी विवाहितेचा मृत्यू झाल्याने वाळणे परिसरात शोककळा पसरली आहे.

महाबळेश्वर पोलिसांनी सांगितले की,महाबळेश्वरपासून 50km अंतरावर असलेल्या वाळणे या गावात सतीश वाळणेकर यांचे लग्न आरती मुसळे हिच्या सोबत कारगाव(ता. खोपोली, जि.रायगड) या ठिकाणी अवघ्या ५ दिवसांपूर्वी झाले होते.

गुरुवार लग्नाची पुजा झाली.रविवार रोजी हळद उतरवण्याचा कार्यक्रम होता.परंतु आरतीची प्रकृती अचानक बिघडली.तिला उलट्या आणि जुलाब होऊ लागल्याने तिला तापोळा येथे उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.परंतु,तेथे पोहोचण्यापूर्वी ती चक्कर येऊन कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.त्याच अवस्थेत तिला आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान,हाॅस्पिटलमध्ये मृत आरतीच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.दोन्ही कुटुंबांची अवस्था पाहुन उपस्थितांना अश्रु अनावर झाले.घटनास्थळी कोणताही अनुसूचित प्रकार घडु नये,म्हणुन पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *