500 रुपयाच्या चाॅकलेटन् केलं तासाभरात लखपती, ऐवढा पैसा पाहुन स्वत: रानीला बसला आश्चर्याचा धक्का

काही लोकांना चॉकलेट खायला खूप आवडतं. ही मंडळी सतत काही ना काही निमित्त शोधून चॉकलेट खात असतात. मागवलेल्या पदार्थांमध्ये जास्तीत जास्त चॉकलेट मिळेल, असा प्रयत्न त्यांचा असतो. अशाच एका चॉकलेट लव्हर महिलेला तिच्या आवडत्या चॉकलेटनं मालामाल केलं. ती नेहमी प्रमाणे चॉकलेट खरेदी करण्यासाठी गेली होती.

यावेळी तिने स्वत:सोबतच आपल्या मुलांसाठी देखील ५०० रुपयांची चॉकलेट्स खरेदी केली. अन् आश्चर्याची बाब म्हणजे या चॉकलेट्समुळेच ती रातोरात मालामाल झाली. आवडत्या चॉकलेट्सनं तिला लाखो रुपयांची मालकिण केलं.हि घटना दिल्लीची राहणाऱ्या रानी देसाई नावाच्या महिलेसोबत घडली.

दर आठवड्याला ती चॉकलेट खरेदी करण्यासाठी मुलांसोबत सुपरमार्केटमध्ये जाते. काही दिवसांपूर्वी तिने नॅटविच मार्केटमधून ५०० रुपयांची चॉकलेट्स खरेदी केली होती. चॉकलेट्सवर काही ऑफर्स सुरु असल्यामुळे तिने जास्तीची खरेदी केली. या चॉकलेट्सच्या खोक्यात तिला एक गोल्डन रंगाचं लॉटरीचं तिकिट देखील मिळालं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे या तिकिटावर तिला तब्बल ५ लाख रुपयांची लॉटरी लागली.

चॉकलेट कंपनीनं एकूण २४ चॉकलेट्समध्ये गोल्डन तिकीटं ठेवली होती. त्यापैकी एक तिकिट रानी यांच्या हाती लागलं. ख्रिसमसच्या निमित्ताने चॉकलेट्स कंपन्या सध्या आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या विविध प्रकारच्या ट्रीक्स वापरत आहेत. अन् त्यामुळेच त्यांनी काही लॉटरीची तिकिटं चॉकलेट्समध्ये ठेवली होती. मात्र याच तिकिटामुळे रानीला रातोरात लखपती झाली. दररोज चॉकलेट खाण्याची आवड तिच्यासाठी खूपच फायदेशीर ठरली. आता या पाच लाखांचा वापर ती आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करणार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *