मी १०० वर्षे जगलो असतो, पण तिना…;नाशिकमध्ये आयुष्य संपवलेल्या CAच्या अखेरच्या पत्रात तिचा उल्लेख
मुंबई: मुंबईच्या पूर्व उपनगरातील मुलुंडमध्ये वास्तव्यास असलेल्या सीएनं २ आठवड्यांपुर्वी नाशिकच्या इगतपुरीत गळफास लावुन आत्महत्या केली.एका रिसॉर्टमध्ये सीए चिराग वरैया यांनी आयुष्य संपवलं.चिराग यांनी त्यांच्या शेवटच्या पत्रात माजी महिला कर्मचाऱ्याचा उल्लेख केला आहे.पोलिसांच्या कारवाईमुळे हि वेळ आल्याचं देखील त्यांनी चार पानी पत्रात नमुद केलं आहे.मिड डेनं याबद्दल वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
भांडुप पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात चिराग यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाली होती.त्यांच्यासोबत आधी काम केलेल्या एका महिलेनं हि तक्रार नोंदवली.’माझं शेवटचं पत्र’ या शीर्षकाखाली चिराग यांनी एक सुसाईड नोट लिहिली.त्यात त्यांनी माजी कर्मचारी महिलेनं आणि तिच्या पतीनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचं म्हटलयं.
चिराग वरैया यांनी त्यांच्या शेवटच्या पत्रात पोलीस/डीसीपी ऑफिसचा उल्लेख केला आहे.’तुमच्या खोट्या कारवाईमुळे माझ्या संपुर्ण कुटुंबाला धक्का बसलायं.माझं कुटुंब,माझे क्लायंट आणि माझे कर्मचारी असे ५०० जण माझ्यावर अवलंबून आहेत.मी १०० वर्षे जगलो असतो.पण खोट्या आणि लालसेपोटी केलेल्या कारवाईमुळे मला माझं आयुष्य संपवावं लागत आहे,’असं वरैया यांनी पत्रात म्हटलयं.
‘झालं ते झालं.पण भविष्यात अशी चुक पुन्हा करू नका.गेल्या काही वर्षांत मी चांगलं नाव कमावलं होतं.मात्र माझी सगळी प्रतिष्ठा धुळीस मिळाली,’असं चिरागनी म्हटलयं.’आम्हाला सीए चिराग वरैया यांची सुसाईड नोट मिळाली आहे.त्यातलं हस्ताक्षर चिरागच्या हस्ताक्षराशी जुळत आहे.त्यांनी पोलिसांच्या भ्रष्टाचाराबद्दल लिहिलं आहे.मात्र त्यांनी कोणाच्याच नावाचा उल्लेख केलेला नाही,’अशी माहिती नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सहाजी उमपे यांनी दिली.
शक्य झाल्यास गुंतवणुकदारांना सगळे पैसे देऊन टाक आणि चांगली माणुस हो,असा सल्ला चिराग यांनी त्यांच्या माजी सहकारी महिलेला दिला आहे.’माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मी खोटं बोलणार नाही.मी माझ्या सहकारी महिलेला कधीच स्पर्श देखील केलेला नाही.तिनं दिलेला जबाब पुर्णपणे खोटा आहे.मात्र त्या सगळ्यांना माफ करण्यात यावं.त्यांना चांगला माणुस होण्याची संधी मिळावी,हीच माझी अखेरची इच्छा आहे,’असं चिराग यांनी शेवटच्या पत्रात लिहिलं आहे.