8 दिवसांवर लग्न अन् सकाळी सापडली बाॅडी, वाशिममध्ये लेकाच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणार्या पालकांच्या डोळ्यात अश्रु

वाशिम: विदर्भात सध्या गहु-हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे.मात्र काढणीस आलेले पीक जंगली जनावर फस्त करतात.काढुन वाळत घातलेल्या व काढणीस आलेल्या पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर जागरण करतात.अनेकदा या शेतकऱ्यांवर रानडुकरे,रोही आणि अस्वल हल्ले करतांना दिसतात.असाच प्रकार वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील तऱ्हाळा शेतशिवारात घडला आहे.

तऱ्हाळा येथील २८ वर्षीय युवा शेतकरी गणेश प्रकाश बाईस्कर शेतात जमा करून ठेवलेल्या हरभऱ्याची राखण करण्यासाठी काल रात्री शेतात गेले होते.पहाटे ५च्या सुमारास त्याच्यावर रान डुकरांच्या कळपाने हल्ला केला.या हल्ल्यात ते जागीचं गतप्राण झाले.आज सकाळी काही शेतकरी शेतात गेल्यावर हि घटना उघडकीस आली.हा हल्ला इतका भीषण होता की गणेशच्या शरीरावर मोठ-मोठ्या जखमा झाल्या होत्या.

८ दिवसांवर आले होते लग्न
रान डुकरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या गणेशचं लग्न अवघ्या ८ दिवसांवर आलं होत.मात्र लग्नाच्या गडबडीत शेतातील कामे रेंगाळतील आणि येत्या काही दिवसात पावसाची शक्यता असल्याने काल गडबडीने त्यांनी हरभऱ्याची सोंगणी करण्याचं ठरवलं.काल सोंगणीनंतर राखण करण्यासाठी ते शेतात गेले होते.

प्रकाश विठ्ठलराव बाईस्कर यांना ५ मुले आणि १ मुलगी आहे.गणेश भावंडांमध्ये चौथा होता.घरात त्याच्या लग्नाची लगबग सुरु होती.आई वडील लेकाच्या सुखी संसाराची स्वप्ने पाहत होती.मात्र आता बाईस्कर कुंटुंबाच्या डोळ्यात अश्रुच उरले आहेत.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *