|

8 वर्षाच्या पोराला कोब्रा साप चावला पण त्याच्याऐवजी सापचं मेला, कारण जाणुन जाग्यावर उडालं

जशपुर जिल्ह्यातील तपरिरासह इतर भागात सर्पदंशाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.दरवर्षी येथे २० हुन अधिक आदिवासींचा सर्पदंशाने मृत्यू होतो.मात्र यावेळी आदिवासी भागातील गार्डन तालुक्यात असलेल्या पंडरापथ गावात विचीत्र प्रकार समोर आला आहे.इकडे घरात खेळत असलेल्या एका मुलाला कोब्रा साप चावला.

वेदनेने रडत असताना त्या मुलालाही प्रचंड राग आला आणि त्याने त्याच सापाला पकडुन २-३ ठिकाणी दातांनी चावा घेतला.आश्चर्य म्हणजे उपचारानंतर ८ वर्षांचा पोरगा वाचला,मात्र कोब्रा सापाचा मृत्यू झाला.विशेष म्हणजे ज्या मुलाला साप चावला आहे,तो छत्तीसगडमधील लुप्त होत चाललेल्या कोरवा जमातीतील आहे.या जमातीचे लोक राष्ट्रपतींचे दत्तक पुत्रही मानले जातात.हि प्रजाती वाचवण्यासाठी सरकार दरवर्षी करोंडो रुपये खर्च करते.

सर्पदंशानंतर मृत्यूच्या दाढेतुन परत आलेला ८ वर्षीय दिपक म्हणाला,मी माझ्या बहिणीसोबत अंगणात खेळत असताना अचानक मागुन कोब्रा साप आला आणि माझ्या पाठीवर चढला.जेव्हा मला साप चावला तेव्हा त्याचा खुप राग आला,मी पळुन जाणाऱ्या सापाला धरले आणि दाताने त्याचा चावा घेतला.

आई बहिणीनं रुग्णालयात नेले…
त्यानंतर लगेचच दिपकने आपल्या बहिणीला त्याला साप चावल्याचं सांगितले.त्यानंतर आई आणि बहिणीने त्याला हाॅस्पिटलमध्ये नेले.आपल्या पोराला साप चावला होता आणि मुलानेही रागाच्या भरात त्याच सापाला चावला असल्याचं आईने सांगितले.

दिपकची बहीणही सांगते की,माझा भाऊ माझ्याकडे धावत आला आणि मला साप चावल्याचं सांगितलं.मग आई आणि मी मिळुन त्याला दवाखान्यात नेले.ही पहिलीच वेळ आहे की,विषारी नाग कोब्रा मुलाला चावला आणि उपचारादरम्यान तो वाचला.मुलाच्या चाव्यामुळे सापाचा मात्र मृत्यू झाला.

सर्पतज्ज्ञांना काय वाटतं?
या आश्चर्यकारक घटनेबाबत डाॅक्टरांनी सांगितले की,साप चावल्यावर त्याचे विष शरीरात सोडतो,परंतु या प्रकरणात कोब्राने मुलाला चावल्यानंतर त्याचे विष शक्यतो सोडले नाही असं काही लोकांचे मत आहे.

दुखापतीमुळे साप मरण पावला
त्याचवेळी जशपुर जिल्ह्यातील डॉ. लक्ष्मीकांत बापट सांगतात की,दिपकला जेव्हा साप चावला,तेव्हा त्याच्यावर विषरोधी इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले.पण दिपकने ज्या सापाला चावलं त्याचा मृत्यू जखमी होऊन झाल्याचं डॉक्टरांच म्हणणं आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *