OMG! १० सेकंदात पैसे चौपट! महिलेनं चपातीमध्ये ५०० रुपये टाकले अन् २ हजार रुपये काढले
सोशल मीडियावर विविध प्रकारच्या ट्रिक्स, हॅक्स किंवा जुगाडू व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. दररोज शेकडो असे व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र अशी ट्रिक तुम्ही आयुष्यात कधीच पाहिली नसेल. जर ही जादू खरी निघाली तर देशातलीच काय तर जगातली गरीबी रातोरात नाहिशी होईल. तर, ट्रिक अशी आहे की, महिलेनं चपाती करताना पिठाच्या गोळ्यात ५०० रुपयांची नोट टाकली.
अन् जेव्हा ही चपाती तव्यावर छान भाजून काढली, तेव्हा त्यामधून चक्क २ हजार रुपयांची नोट निघाली. शब्दांवर विश्वास बसत नाहिये तर मग हा व्हिडीओ पाहा, तुम्ही देखील हैराण व्हाल. (फोटो सौजन्य – janu9793/Instagram) ‘या’ तरुणींना पाहून पोलीस लागले पळू, बाईकचा पाठलाग करून व्हिडीओ केला व्हायरल
ही जादू केली तरी कशी?
हा व्हिडीओ janu9793 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. या महिलेनं ही ट्रिक नेमकी केली कशी? हे तर देवच जाणो, पण पाहताना मात्र भन्नाट वाटतेय. तर तिनं सर्वात आधी कणिक छान मळून घेतलं. मग तिनं पिठाचा एक गोळा घेतला अन् त्यामध्ये ५०० रुपयांची नोट ठेवली. मग त्या ५०० रुपयांच्या गोळ्याला छान लाटून चपाती तयार केली. मग ही चपाती लोणी वगैरे लावून तव्यावर भाजून काढली.
आता सगळ्यांनाच प्रश्न पडला होता की त्या ५०० रुपयांच्या नोटेचं काय झालं? तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पाचशे रुपयांचं २ हजार रुपयांच्या नोटेत रुपांतर झालं. हा व्हिडीओ आतापर्यंत ७५ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अन् सर्वांना एकच प्रश्न पडलाय खरंच चपातीमधून पैसे चौपट वाढतात का? तुम्हाला काय वाटतं कशी केली असेल ही जादू? (फोटो सौजन्य – janu9793/Instagram) ‘मुंबईला आता बुमराहची गरज नाही’, अर्जुन तेंडुलकरच्या खतरनाक बॉलिंगवर भन्नाट मीम्स व्हायरल
View this post on Instagram