tv चा आवाज वाढवला, २ चिमुरड्याचं तोंड मरेपर्यंत उशींना आईना दाबलं; सोलापुरातल्या खुनाचं विचीत्र कारण समोर

सोलापूर : पती पत्नीच्या भांडणात दोन चिमुकल्यांचा हकनाक बळी घेतला गेल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये उघडकीस आली आहे. आईनेच दोन लेकरांचा खून केला आणि त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार घडला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ज्योती सुहास चव्हाण या महिलेने आत्महत्या केली. आत्महत्येआधी अथर्व आणि आर्या या दोन चिमुकल्यांचा खून केला. खूनाची माहिती मिळताच विजापूर नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर या घटनेने सोलापूरमध्ये खळबळ उडालीय. आईने मुलांचे तोंड उशीने दाबून त्यांची हत्या केली. यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. विजापूर रस्त्यावरील राजस्व नगरात ज्योती तिच्या पती आणि मुलांसह राहत होती.

ज्योतीचे पती सुहास चव्हाण हे एसटीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत आहेत. पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती समोर आली असून त्याच वादातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अथर्व आणि आर्या हे शाळेला सुट्टी असल्याने घरी होते. गुरुवारी दुपारी टीव्ही पाहत असताना ज्योतीने टीव्हीचा आवाज वाढवला. त्यानंतर मुलांच्या तोंडावर उशी ठेवून दाबली. यात दोन्ही मुलांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ज्योतीने स्वत:ही गळफास घेऊन जीवन संपवलं.

पोलिसांना या घटनेची माहिती सायंकाळी पाच वाजल्यानंतर मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ज्योतीसह तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. ज्योती पतीवर सतत संशय घ्यायची. यातूनच त्यांचे वाद होत असत अशी माहिती पती सुहासने पोलिसांना दिली. पोलिसांनी पती सुहास चव्हाणला चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *